अंधेरी (andheri) प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) चालू असलेल्या विशेष मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांत ऑटो रिक्षांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. यात परमिट, परवाना, प्रमाणपत्रे आणि गणवेशाविना ऑटो रिक्षा चालवल्याबद्दल तसेच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 200 हून अधिक गुन्हे नोंदवले आहेत.
यात सुमारे 44% गुन्ह्यांची नोंद वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर झाली आहे. वांद्रे (bandra) रेल्वे स्थानक शहरातील सर्वात व्यस्त ट्रान्झिट पॉइंटपैकी एक आहे. येथे 113 ऑटो रिक्षा मालकांना ई-चलान लागू करण्यात आले आहेत, असे आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांनी सांगितले.
RTO ला स्टेशनबाहेरील ऑटो चालक (auto drivers) अधिक शुल्क आकारून ग्राहकांना त्रास देतात, भाडे नाकारतात, उद्धटपणे वागतात आणि अयोग्यरित्या वाहने चालवतात, अशा तक्रारी कायमच नागरिकांकडून केल्या जातात.
“दोन दिवसांत, आम्हाला 28 ऑटोचालक त्यांच्या अनिवार्य बॅचशिवाय सापडले आणि आठ ऑटो रिक्षा ज्यांची मुदत संपलेली होती. तसेच इतर अनेकांचे परमिट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रे (PUC) कालबाह्य झाली होती.” असे अंधेरी आरटीओच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दोन दिवसांत 209 वाहनांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामुळे 83 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आणि 41 ई-चलान लागू करण्यात आले.
जोगेश्वरी, सांताक्रूझ आणि विलेपार्ले येथील रेल्वे स्थानके आणि डीएन नगर आणि वर्सोवा येथील मेट्रो स्थानके यासारख्या इतर व्यस्त भागांमध्ये आणखी 265 वाहनांची तपासणी करण्यात आली होती.
त्यापैकी 72 वाहनांना ई-चलान (E-challan) लागू करण्यात आले तर 39 चालक बॅजशिवाय वाहने चालवताना आढळून आले.
अंधेरी आरटीओचे प्रमुख अनिल पाटील म्हणाले, “आम्हाला तुटलेली विंडस्क्रीन, नॉन-फंक्शनल हेडलाइट्स आणि टेल लाइट्स, अकार्यक्षम इंडिकेटर असलेले अनेक ऑटो देखील सापडले आहेत. पुढील काही दिवस वांद्रे ते गोरेगाव दरम्यान ही मोहीम सुरू ठेवली जाईल, असेही ते म्हणाले.