Advertisement

11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य

पुढील वर्षापासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.

11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य
SHARES

महाराष्ट्र सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance Std XI & XII Students) लागू करणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना चेहऱ्यावरुन ओळख किंवा फिंगरप्रिंट-आधारित बायोमेट्रिक्स (Biometric Attendance) वापरून उपस्थिती चिन्हांकित करणे आवश्यक असेल. 

शाळेतील वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण आणि तितकाच धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता वर्गामध्ये एकूण शैक्षणिक वर्षामध्ये 75% उपस्थिती अनिवार्य असणार आहे.

अनेक विद्यार्थी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये नियमीत प्रवेश घेतात. मात्र, प्रत्यक्षात वर्गात उपस्थित न राहता ते चक्क खासगी शकवणीस जातात. हा सर्व प्रकार शाळा आणि खासगी कोचिंग सेंटर्स (Coaching Classes) आणि पालक यांच्यात असलेल्या परस्परसंमतीने घेतला जातो. त्यामुळे हे संगनमताचे अनधिकृत संबंध तोडणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ उद्देशाकडे परत आणने हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

राज्यभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये म्हणजेच ज्युनियर कॉलेजमध्ये सध्या अनेक विद्यार्थी ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतात.

परंतु, प्रवेश घेतल्यानंतर वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहून शैक्षणिक वर्ष पूर्ण करणे आणि शालेय अभ्यासावर भर देणे अपेक्षीत असताना अनेक विद्यार्थ्यांची प्राधान्ये वेगळी असतात. हे विद्यार्थी, वर्गात उपस्थित न राहता, NEET, JEE आणि MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी खाजगी कोचिंग क्लासेस आणि संस्थांमध्ये जातात.

बहुतेकदा कोचिंग सेंटर आणि महाविद्यालयांमध्ये अनौपचारिक सामंजस्य असते जेणेकरून उपस्थितीचे निकष टाळता येतील. (हेही वाचा, राज्यातील शाळामध्ये बायोमेट्रिक मशिनद्वारे घेण्यात येणार हजेरी; विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाचा उपक्रम)



हेही वाचा

पालिका मुंबईतील 55 पूरग्रस्त ठिकाणांवर काम करणार

उंच इमारतींसाठी नवीन अग्निशमन तंत्रज्ञानाचा वापर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा