Advertisement

विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात मोहीम, पहिल्याच दिवशी ८ लाखांचा दंड वसूल

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. अनेक लोक बाहेर पडताना मास्क घालत नसल्याचं आढळून आलं आहे. पालिकेने अशा लोकांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.

विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात मोहीम, पहिल्याच दिवशी ८ लाखांचा दंड वसूल
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. अनेक लोक बाहेर पडताना मास्क घालत नसल्याचं आढळून आलं आहे. पालिकेने अशा लोकांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.  मुंबईत रोज तब्बल वीस हजार नागरिक विना मास्क फिरताना आढळून येत असून त्यांच्यावर कारवाईचे कडक निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी जारी केले आहेत. 

कारवाईची सुरुवात सोमवारपासून पूर्ण मुंबईत झाली. पहिल्याच दिवशी मास्क न घातलेल्या ४३०० लोकांना पकडण्यात आले. प्रत्येक व्यक्तीकडून २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. सोमवारी एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

एप्रिलपासून मुंबई महापालिकेने १ कोटी ५ लाख रुपयांचा दंड मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला आहे. या कालावधीत एकूण ३८  हजार ८६६ लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. दंड वसूल करण्यासाठी, महापालिकेने ९८० लोकांची एक खास टीम तयार केली आहे. ही टीम संपूर्ण मुंबईत फिरणार आहे.

पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, ही मोहीम सुमारे एक महिना चालणार आहे. ते रोज परिस्थितीचा आढावा घेतील. मुंबईत मास्क न घालणाऱ्या रोज जवळपास २०  हजार नागरिकांना शिक्षा देण्याचे व्यापक अभियान सुरू करणार आहे. एप्रिल २०२० पासून सार्वजनिक स्थळांवर मास्क न घालणाऱ्या लोकांसाठी २०० रुपये दंड ठोठावण्यात येईल.



हेही वाचा -

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा