मुंबईच्या (mumbai) वाहतूकी संदर्भात एमएमआरडीएन मोठे पाऊल उचलले आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह (marine drive) भूमिगत भुयारी मार्गाच्या बांधकामाला मोठे आर्थिक पाठबळ (financial help) मिळाले आहे.
एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गासाठी आर्थिक नियोजन केले आहे. मुंबईतील युनियन बँक ऑफ इंडियाने या मार्गाला 7326 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे या मार्गाची उभारणी वेगाने होणार आहे.
एमएमआरडीएचे (mmrda) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे. याप्रसंगी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आणि सहायक महानगर आयुक्त अश्विन मुद्गल आदी मान्यवर उपस्थित होते.
एमएमआरडीएच्या निर्णयामुळे मुंबई उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक पाठबळामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन मुंबईकरांसाठी वेगाने प्रवास करण्याचा नवा मार्ग मिळाल्याने वाहतूकीत क्रांती घडणार आहे.
या प्रकल्पात 9.2 किलोमीटरचा दुहेरी मार्ग असणार आहे. ज्यात 6.52 किलोमीटरचे जुळे बोगदे असतील. प्रत्येक बोगदा हा 11 मीटर रुंद असणार आहे. यात दोन लेन वाहतुकीसाठी असतील आणि तिसरी लेन आपत्कालीन वापरासाठी सुरक्षित राखलेली असेल.
मानखुर्दला चेंबूर जंक्शन आणि ऑरेंज गेटशी जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेमुळे दक्षिण मुंबईच्या (south bombay) दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत सुधारणा झाली असली तरी ऑरेंज गेटवरील वाढत्या वाहतुकी कोडींमुळे हा ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह हा दुहेरी बोगदा मार्ग आवश्यक बनला असून त्याला आर्थिक सहकार्य मिळाले आहे.
हेही वाचा