Advertisement

उंच इमारतींसाठी नवीन अग्निशमन तंत्रज्ञानाचा वापर

उंच इमारतींमध्ये आग विजवताना या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

उंच इमारतींसाठी नवीन अग्निशमन तंत्रज्ञानाचा वापर
SHARES

उंच इमारतींमध्ये अग्निशमन कार्यक्षमता वाढविण्यासाठी बीएमसी कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टम (सीएएफएस) सुरू करण्याची योजना आखत आहे.

“सीएएफएसमध्ये उत्कृष्ट अग्निशमन क्षमता उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी, फोम कॉन्सन्ट्रेट आणि कॉम्प्रेस्ड एअर एकत्रित करून अधिक प्रभावी असा शक्तिशाली अग्निशमन फोम तयार होतो”, असे मुंबई अग्निशमन दलाच्या (एमएफबी) अधिकाऱ्याने सांगितले.

उंच इमारतींमध्ये आग विजवताना पाण्याचा दाब कमी होतो. तिथे कॉम्प्रेस्ड एअर फोमिंग सिस्टम वापरून ही समस्या सोडवली जाईल. कारण अग्निशमन दलातील कर्मचारी सीएएफएसचे पोर्टेबल युनिट वाहून नेऊ शकतो, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्य अग्निशमन अधिकारी (सीएफओ) रवींद्र अंबरगेकर म्हणाले, “आम्ही उंच इमारतींमध्ये आमची अग्निशमन क्षमता वाढवण्यासाठी या सिस्टमवर काम करत आहोत.”

एमएफबीच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, “ही सिस्टम प्रभावी फोम निर्माण करते. यामुळे आग जलद विझण्यास मदत होते. यामुळे पाण्याचा वापरही कमी केला जातो. यामुळे पा्याची कमतरता असलेल्या भागांमध्ये देखील या सिस्टमचा फायदा होऊ शकतो.”

मुंबईत 4000 हून अधिक उंच इमारती आणि 40 मजल्यांवरील 200 हून अधिक गगनचुंबी इमारती आहेत. अग्निसुरक्षेच्या नियमांनुसार, सर्व उंच इमारतींना अग्निशमन दलाच्या अंतर्गत अग्निशमन यंत्रणेची देखभाल करणे आवश्यक आहे जसे की समांतर पाणीपुरवठा, अग्निशामक अलार्म आणि अग्निशामक स्प्रिंकलर्स.

“जरी उंच इमारतींमध्ये अंतर्गत अग्निशमन यंत्रणेसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली गेली असली तरी, आपत्कालीन परिस्थितीत, आम्ही कधीही त्यावर अवलंबून राहत नाही. आम्ही आमची अग्निशमन यंत्रणा आमच्यासोबत ठेवतो,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.

“यात पोर्टेबल बॅकपॅक-आकाराचे CAFS युनिट्स आहेत जे अग्निशामक वाहून नेऊ शकतात. हे मशीन ड्रोन वापरून देखील चालवता येते. अग्निशामकांना पोहोचता येत नसलेल्या भागात पोहोचण्यासाठी CAFS नोझल असलेले ड्रोन विकसित केले जात आहेत,” असे अधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केले.



हेही वाचा

जिथे बघाल तिथे खोदकाम, नागरिक त्रस्त

नवी मुंबई: जासई उड्डाणपूल बाईकस्वारांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा