Advertisement

नवी मुंबई : 4 फेब्रुवारीला 10 तासांसाठी पाणीकपात

पाईपलाईनचे काम झाल्यावर देखील रहिवाशांना कमी पाण्याचा दाब आणि अपुरा पुरवठा जाणवू शकतो.

नवी मुंबई : 4 फेब्रुवारीला 10 तासांसाठी पाणीकपात
SHARES

बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळील मोरबे येथील मुख्य पाण्याच्या पाईपलाईनचे तातडीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिकेने (NMMC) मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी 10 तासांचा पाणीपुरवठा बंद करण्याची घोषणा केली आहे.

अधिकृत निवेदनानुसार, नवी मुंबईतील पाणीपुरवठा (water supply) सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत खंडित होणार आहे. या निर्णयामुळे अनेक भागावर याचा परिणाम होणार आहे. यात बेलापूर, नेरुळ, वाशी (vashi), तुर्भे, सानपाडा, कोपर खैरणे, घणसोली आणि ऐरोली यांचा समावेश आहे.

या भागांव्यतिरिक्त, मुख्य पाईपलाईनमधून थेट पाणी कनेक्शन आणि कामोठे नोड (सिडको क्षेत्र) ला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी पाईपलाईनचे काम झाल्यावर देखील रहिवाशांना कमी पाण्याचा दाब आणि अपुरा पुरवठा जाणवू शकतो.

या काळात नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

या वर्षातील दोन महिन्यांत दुसऱ्यांदा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. याआधी, 8 जानेवारी रोजी, नवी मुंबई महानगरपालिकेने एक दिवस आधी अधिसूचना जारी करून मुख्य पाण्याच्या पाईपलाईनची तातडीची दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.



हेही वाचा

राज्यातील 80% शाळांमध्ये डिजिटल लर्निंगचा पर्याय

मुंबई : प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आधुनिक मशीन खरेदी करणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा