Advertisement

मुंबईतील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोल माफी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली.

मुंबईतील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोल माफी
SHARES

मुंबईत हलक्या मोटार वाहनांच्या प्रवेशासाठी पाचही टोलनाक्यांवर कोणताही टोल आकारला जाणार नाही, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा करण्यात आल्याचं समोर आले आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे.

शिवसेना-भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने 1995 ते 1999 या काळात बांधलेल्या 55 उड्डाणपुलांसाठी 45 रुपये टोल आकारत होते. 

एमएसआरडीसीने मुलुंड, ऐरोली, दहिसर आणि मानखुर्दसह विविध नाक्यांवर टोल वसूल केला जात असे. मात्र, आज रात्री 12 वाजल्यापाासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांकडून टोल आकारला जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.

नवीन ठाणे खाडी पुलाचा खर्च वसूल करण्यासाठी एमएसआरडीसीने टोल सुरू ठेवण्याची इच्छा असूनही सरकारने तो बंद करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेने टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केली. तसेच रस्त्याचा खर्च वसूल झाला असूनही टोल आकारला जात आहे, असा त्यांनी आरोप केला.

कोणत्या वाहनांना टोलमाफी लागू असणार?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.

मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसेची वारंवार मागणी

यासाठी मनसे पक्षाकडून महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईतील सर्व टोल माफ करण्यात यावे, यासाठी मनसेकडून वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. या मुद्द्यासाठी अनेकदा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा