Advertisement

मुसळधार पावसामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

सध्या रायगड किल्ल्यावर असलेल्या पर्यटकांना रोपवेद्वारे किल्ल्यावरून खाली आणले जात आहे.

मुसळधार पावसामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
SHARES

रायगड (Raigad) जिल्ह्याला गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे तेथील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. अशातच प्रशासनाने जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) आदरणीय स्थान तसेच समस्त शिवभक्तांचे आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण रायगड जिल्हा पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड किल्ल्याकडे जाणारे चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग पोलिसांद्वारे बंद करण्यात आले आहे. 

तसेच सध्या जे पर्यटक रायगड किल्ल्यावर अडकून होते त्यांना रोपवेच्या आधारे खाली आणण्यात आले. तसेच वर किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे सेवा बंद करण्यात आली आहे. 

आज रायगडात मुसळधार पाऊस कोसळला आहे. काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहायला मिळतंय, यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत.  किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप आलं आहे, त्यामुळे यावरुन खाली उतरणं देखील कठीण झालं आहे.

रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटक अडकले

आज अनेक पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे येथील अडकलेले पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या पायऱ्यांवरील वाट काढत मार्ग काढू लागले. आता कसेतरी हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरुप बाहेर पडले आहेत. मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये, असं आवाहन सध्या करण्यात येत आहे.

नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम

नाशिकहून (Nashik) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या तसेच येणाऱ्या गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. मुंबईहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना उशीर होत असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.



हेही वाचा

मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार : IMD

Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या 5 एस्क्प्रेस गाड्या रद्द

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा