Advertisement

‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी

वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची घोषणा

‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी
SHARES

विधानसभा निवडणुकीनंतर गरज नसतानाही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांना धक्का बसणार आहे. कारण मिळालेल्या तक्रारीनंतर लाडकी बहिणसाठी आलेल्या अर्जांची पुन्हा छाननी होणार आहे. 

अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून केल्या जात आहेत. त्यामुळे पुन्हा छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील, अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एका वृत्तपत्राला दिली. 

लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत. आता अर्जांची छाननी केली जाईल. त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थीला बाद केले जातील, असे माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाले. 

महायुती सरकारच्या शपथविधी सभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजना’ कायम राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

त्याच वेळी निकषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्जांची  छाननी सुरू करण्यात आली असून 2 कोटी 34 लाख लाभार्थींपैकी 15 ते 20 टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता

मुंबई : मालाडमध्ये प्राण्यांचा शवाघर सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा