सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी ठाण्यात म्हाडा लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहेत. नुकतेच म्हाडाकडे कोकण मंडळाच्या 2147 सदनिका आणि भूखंड विक्रीकरिता सुमारे 24, 922 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले होते. ही सोडत निघाली त्यात अनेकांचा हिरमोड झाला होता.
परंतु आता म्हाडाच्या कोकण मंडळाने पुन्हा नवीन घरांची योजना आखली आहे. त्यामुळे सामान्यांना नाराज होण्याची गरज नाही. कारण म्हाडा कोकण मंडळ सुमारे 2 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहेत.
कोकण मंडळाने पुन्हा नवीन घरांची योजना आखली आहे. येत्या काही महिन्यात म्हाडाचे कोकण मंडळ 2 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यात ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा समावेश असणार आहे.
गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळानं तीन सोडत काढल्या होत्या. ज्यात सुमारे १० हजार जणांचे घराचे स्वप्न पु्र्ण झाले होते. या वर्षीही सुमारे 2 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी कोकण मंडळाने दर्शवली आहे.
यात ठाण्यातील चितळसर येथे उभारलेल्या 1173 घरांसह 15 टक्के गृहनिर्माण योजनेअंतर्गत आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा समावेश असणार आहे. म्हाडानं चितळसर येथे 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केल्या आहेत.