Advertisement

कोकणवासियांसाठी बोरिवलीहून सुटणार पहिली रेल्वे

खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते या रेल सेवेचे उद्घाटन झाले आहे.

कोकणवासियांसाठी बोरिवलीहून सुटणार पहिली रेल्वे
SHARES

बोरिवलीहून (borivali) कोकणात जाण्यासाठी एक्स्प्रेस सेवा सुरू करावी, अशी कोकणातील जनता वर्षानुवर्षे सरकारकडे मागणी करत होती. खासदार पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोकणातील लोकांसाठी बोरिवलीहून कोकणवासियांसाठी रेल्वे (railway) सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यानंतर पियुष गोयल (piyush goyal) यांनी या मागणीवर तातडीने निर्णय घेतला.

बोरिवलीहून कोकणात ट्रेन सुरू

गुरुवार, 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.50 वाजता बोरिवली येथून निघणाऱ्या कोकण रेल्वेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उत्तर मुंबईचे खासदार, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुंबई भाजप अध्यक्ष एड. आशिष शेलार, माजी खासदार गोपाळ शेट्टी, सर्व आमदार प्रवीण भाऊ दरेकर, सौ.मनिषा चौधरी, अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील राणे, प्रकाश सुर्वे, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, रेल्वेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

बोरिवलीहून कोकणात निघालेल्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांनी आपल्या भाषणात केंद्राने केलेल्या तरतुदी आणि मुंबई रेल्वेसाठी निधीच्या वाटपाबद्दल सांगितले.

उत्तर मुंबईचे खासदार या नात्याने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, 170 वर्षात प्रथमच बोरिवली येथून आज रेल्वे निघणार असून ही ट्रेन वसई (vasai) पनवेलहून (panvel) कोकणात जाणार आहे. यासाठी गोयल यांनी केंद्रातील त्यांच्या सहकारी अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

यावेळी बोरिवली स्थानक पूर्व भागातील नागरिक आणि खास कोकणी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.


हेही वाचा

मुंबई : महारेरा वेबसाईट दोन दिवस बंद राहणार

मध्य-पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा