Advertisement

नवी मुंबई : लोकल ट्रेन पकडताना महिला पडली

घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि प्रवाशांनी ट्रेनखाली घसरलेल्या महिलेला वाचवले...

नवी मुंबई : लोकल ट्रेन पकडताना महिला पडली
SHARES

मुंबई (Mumbai) , नवी मुंबई (Navi Mumbai), कल्याण (Kalyan) , ठाणे (Thane), डोंबिवली (Dombivali) परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या (Central Railway) लोकल सेवा आणि ट्रान्स हार्बर (Trans harbour) लोकल सेवेवरही झाला आहे.

मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर (Ghatkopar), दादर या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. हार्बर रेल्वे स्थानकांवरही तीच परिस्थिती होती. याच गर्दीमुळे एका महिलेला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. 

सीबीडी बेलापूर येथे ट्रेनमध्ये चढण्यासाठी थांबलेली एक महिला रुळावर खाली पडून रेल्वेखाली आल्याची घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. ती वाचली पण तिने तिचे दोन्ही पाय गमावले. प्रवासी ट्रेनची वाट पाहत असताना रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच गर्दीत महिलेचा पाय घसरला आणि ट्रेनचा पहिला डबा तिच्या अंगावरून गेला. इतर प्रवासी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी महिलेचा जीव वाचवण्यासाठी मोटरमनला ट्रेन मागे घ्यायला सांगितली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन?

मुंबईत सर्वत्र मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून, रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून रुळांमधील पाणी हटवण्याचे काम सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन सेवांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत

वैतरणा, भातसा, बारवी, खडकवासलासह प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा