41 दिवसांच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने (WR) मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी गोरेगाव (goregaon) आणि कांदिवली दरम्यान नवीन सहावी लाईन सुरू केली आहे. ही लाईन लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहे.
नवीन लाईन 4.54 किलोमीटर लांब आहे आणि वांद्रे (bandra) पासून विस्तारित आहे. पाचव्या आणि सहाव्या दोन्ही मार्गांवर आता लांब पल्ल्याच्या गाड्या (long-distance trains) चालवल्या जातील. तसेच उपनगरीय गाड्या (mumbai local train) इतर मार्गांवर चालवल्या जातील. यामुळे प्रवासाला होणारा विलंब कमी होईल.
याव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वे कांदिवली (kandivali) - बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यापैकी सुमारे 15% काम आधीच पूर्ण झाले आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (CRS) यांनी पत्राद्वारे नवीन ट्रॅकच्या वापरास मान्यता दिली आहे.
तसेच या पत्रात चिंता देखील मांडल्या आहेत:
- या पत्रात रुळांजवळील अतिक्रमणाचा मुद्दा मांडण्यात आला होता. रेल्वेला अतिक्रमण रोखण्यासाठी काही भागात कुंपण किंवा भिंत बांधावी लागेल.
- सीआरएसने सिग्नलिंग आणि टेलिकॉम केबल्सबाबतही चिंता व्यक्त केली. गोरेगाव स्थानकावर सिमेंट काँक्रीटच्या खाली काही केबल्स गाडलेल्या आढळल्या. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे कठीण होते.
- एका सिग्नल बॉक्सला गंज लागल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
- सीआरएसने मालाड स्टेशनमधील अपूर्ण कामांकडेही लक्ष वेधले, जसे की पाण्याचे नळ बसवणे आणि टॅक्टाइल फ्लोअरिंग पूर्ण करणे. तसेच मालाड स्थानकाच्या पश्चिमेला येत्या तीन महिन्यांत तात्पुरता प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेने (western railway) या समस्या मान्य करून त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा