Advertisement

अायपीएलच्या फायनलची काॅमेंट्री अाता मराठीतही!


अायपीएलच्या फायनलची काॅमेंट्री अाता मराठीतही!
SHARES

अातापर्यंत अायपीएलमधील सामन्यांचं समालोचन हिंदी किंवा इंग्रजी या भाषेतून एेकत क्रिकेटशौकिन सामन्यांचा अानंद लुटत होते. पण या वर्षी अायपीएलच्या फायनलचं समालोचन मराठीतूनही केलं जाणार अाहे. बाॅलीवुडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित अाणि मराठी चित्रपटसृष्टीतला अाघाडीचा नायक स्वप्निल जोशी यांच्या अावाजात स्टार प्रवाह वाहिनीवर अायपीएलची काॅमेंट्री एेकण्याची संधी मराठी क्रिकेटरसिकांना मिळणार अाहे. अायपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठीत समालोचन केलं जाणार अाहे.


पार्टी तो बनती है...

अायपीएलच्या समारोप साेहळ्यात रणबीर कपूर, सलमान खान, जॅकलिन फर्नांडेझ, करीना कपूर अाणि सोनम कपूर यांचा जलवा पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार असली तरी 'क्रिकेट फायनल्स... पार्टी तो बनती है' या दोन तासांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रणबीर कपूर करणार अाहे.


समालोचकांमध्ये फक्त दोन भारतीय

स्टार स्पोर्टसने प्रादेशिक भाषांमधील समालोचकांवर अधिक भर दिला असला तरी जगभर दाखविल्या जाणाऱ्या अायपीएलच्या अंतिम सामन्यासाठीच्या समालोचकांमध्ये फक्त दोन भारतीयांना स्थान देण्यात अाले अाहे. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर अाणि संजय मांजरेकर हे समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबत सायमन डुल, ग्रॅमी स्मिथ, मायकेल स्लेटर, मॅथ्यू हेडन अाणि मायकेल क्लार्क असतील.


हेही वाचा -

विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज – क्विंटन डी काॅक

पृथ्वी शाॅचे तंत्र सचिन तेंडुलकरसारखे - मार्क वाॅने केली स्तुती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा