विजय हजारे ट्राॅफीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईच्या संघाने दिल्लीचा ४ विकेट्सने पराभव करत शनिवारी विजेतेपदाला गवसणी घातली.
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या चांगल्या गोलंदाजीमुळे दिल्लीला फक्त १७७ धावाच करता आल्या. हे १७८ धावांचे लक्ष मुंबईने आदित्य तरे आणि सिद्धेश लाडच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. या सामन्यात आदित्य तरेनं ७१ धावांची खेळी केली आणि सिद्धेश लाडने ४८ धावांची खेळी केली आहे.
१७८ धावांचं लक्ष्य पार करत असताना मुंबईच्या संघाला देखील सुरूवातीला विकेट गमवाव्या लागल्या. दिल्ली संघातील नवदीप सैनीने पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केलं. तसंच, कर्णधार श्रेयस अय्यर याला कुलवंत खेजरोलिया याने बाद केलं. मात्र, त्यानंतर सिद्धेश लाडने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु ४८ धावांवर सिद्धेश झेलबाद झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि धवल कुलकर्णी यांनी दमदार फलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला.
मुंबई संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करत असताना तुषार देशपांडे आणि धवल कुलकर्णी यांनी दिल्लीचे ३ फलंदाजांना बाद केले. त्यानंतर शिवम दुबेने सिद्धेल लाडकरवी याला बाद केलं. त्याचप्रमाणं, दिल्लीकडून मधल्या फळीत खेळणाऱ्या हिम्मत सिंहने इतर फलंदाजांच्या साथीने १५० धावसंख्या केली.