अशोक सावंत हत्याप्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत


अशोक सावंत हत्याप्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत
SHARES

माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणातील पाचव्या आरोपीला पकडण्यात समतानगर पोलिसांना यश आलं आहे. अनिल वाघमारे असं या आरोपीचं नाव आहे. या पूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे.

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात सावंत यांचं निवासस्थान आहे. रविवारी रात्री मित्रासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांच्या घरापासून सुमारे २०० मीटरवर सावंत यांच्यावर हल्ला झाला. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर १५ वार केले. जखमी आवस्थेत रुग्णालयात नेत असतानाच त्यांचं निधन झालं.



सीसीटीव्हीतून स्पष्ट

या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने तपास सुरू केला. त्यात रिक्षाचालक गणेश जोगदंडचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यावर त्याला दहिसरहून अटक करण्यात आली.


१२ वीतल्या विद्यार्थ्याचा सहभाग

जोगदंडच्या चौकशीतून त्याचा साथीदार सोहेल दोढियाचं नाव समोर आलं. दोढिया घटनास्थळी उपस्थित नसला तरी त्यानेच मुख्य सूत्रधाराच्या वतीने सावंत यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या गुन्ह्यांत पुण्याच्या एका १२ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.


पैशाचं आमिष दाखवलं

या हत्येचा सूत्रधार जगदीश पवार उर्फ जग्गाने त्याला पैशाचे आमीष दाखवून कटात सामील करून घेतल्याची कबुली दिली होती. मात्र पुढे गुन्ह्यात अनिल वाघमारेचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान अनिल दहिसर भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अनिलला अटक केली.



हेही वाचा-

अशोक सावंत यांच्या मारेकऱ्याला अटक, तिघेजण फरार

शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा