कुर्ला (kurla) येथे बेस्ट बसने (best) भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक देत काही पादचाऱ्यांना उडवले होते. या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला असून 49 लोक जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे.
सीएसएमटी (csmt) परिसरात ए 26 क्रमांकाच्या बसने एका व्यक्तीला चिरडले (accident). ज्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू (death) झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात हा अपघात घडला आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
दरम्यान कुर्ला येथे झालेल्या बस अपघाताची चौकशी करण्यासाठी आणि तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
अपघातानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरवर वाहतूकमार्ग वळविल्याची माहिती दिली. “बेस्ट बस अपघातामुळे वालचंद हिराचंद मार्ग जंक्शनवर (आझाद मैदान) वाहतूक संथ गतीने सुरू आहे”, अशी माहिती ट्विटरवर देण्यात आली.
दरम्यान सोमवारी रात्री कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. बेस्ट बसने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातामध्ये 49 जण जखमी झाले. यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.
कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये चार तसेच शीव रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय आणि हबीब रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुर्ला आणि आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर आता ज्या बसने भरधाव वेगात धडक दिली, त्या बसमधील आतला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. अपघात होत असताना बसमधील प्रवाशी जीव मुठीत धरून उभे असताना दिसत आहेत. बस थांबल्यानंतर प्रवाशांनी बसमधून पळ काढला.
हेही वाचा