मुंबईच्या पश्चिम उपनगर मालाड पूर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तर 9 जणांनर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुण हा मनसेचा कार्यकर्ता होता. तसेच त्याचे वडील देखील मनसेचे पदाधिकारी असल्याही माहिती आहे.
मालाड पूर्व येथील दिंडोशी भागातील मनसे कार्यकर्त्याचा मुलगा आकाश माईन (२७) याला रिक्षाचालक आणि स्थानिक विक्रेत्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (12 ऑक्टोबर) घडली.
माईक कुटुंब हे दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी करण्यासाठी गेलं होतं. यावेळी आकाश आणि त्यांची पत्नी हे बाईकवर होते, तर त्यांचे आई-वडील हे रिक्षातून येत होते. सात महिन्यांपूर्वीच आकाश यांचा विवाह झाला होता.
बाईकने जात असताना मालाड रेल्वे स्थानकाजवळ एका ऑटोने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले. त्यानंतर त्यांच्या आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. काही वेळातच वाद खूप वाढला आणि रिक्षाचालकासह त्याच्या इतर साथीदारांनी आणि स्थानिक विक्रेत्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याच्या मुलावर जोरदार हल्ला चढवला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
जेव्हा रिक्षा चालक आणि स्थानिक विक्रेते हे आकाश माईन यांना मारहाण करत होते. तेव्हा आपल्या लेकाला वाचवण्यासाठी आकाश यांची आई त्यांच्यावर आडवी पडली. आपल्या मुलाचं रक्षण करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला.दोन ते तीन अज्ञात व्यक्ती त्याच्या वडिलांनाही मारहाण करत होते. तर, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वडील हात जोडून जमावाला विनंती करत होते.
नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि काही जणांना ताब्यात घेतलं. तसेच, आकाश यांना रुग्णालयात नेण्यात आलं. अखेर त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा