Advertisement

MPSC कडून वयोमर्यादेत शिथिलता

परिक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

MPSC कडून वयोमर्यादेत शिथिलता
SHARES

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध पदांच्या जाहिरातींमध्ये बदल करण्यासाठी आयोगाला लागलेल्या विलंबामुळे वयोमर्यादा ओलांडली. यामुळे अपात्र ठरलेल्या लाखो उमेदवारांना आयोगाने दिलासा दिला आहे. 

राज्य सरकारने एमपीएससीच्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एका वर्षाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत पदभरतीसाठी नव्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनाच या वयोमर्यादावाढीचा लाभ मिळणार आहे. आयोगाकडून गट-ब आणि गट-क या दोन्ही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. गट- ब ची परीक्षा 5 जानेवारीला होणार होती.

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती देणारी x पोस्ट करत ही बातमी जाहीर केली. ज्यामुळं वयोमर्यादा ओलांडल्या कारणाने नोकरीपासून वंचित लाखो उमेदवार आणि इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही पेपरच्या वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.048/2024 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.049/2024 महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 :- 4 मे2025 

या सुधारित जाहिराती प्रसिद्ध होण्यासाठी नियोजित वेळापत्रकापेक्षा बराच कालावधी लागल्याने त्याचा थेट परिणाम भरती प्रक्रियेवर झाला. विशेष म्हणजे, काही महिने उलटून गेल्याने पहिल्या जाहिरातींवेळी वयाच्या अटीत पात्र ठरणारे अनेक उमेदवार या नव्या जाहिराती आल्यानंतर अपात्र ठरले. या प्रक्रियेत आपली काहीच चूक नसल्याने ही संधी जाऊ नये, यासाठी उमेदवारांनी वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी लावून धरली होती.



हेही वाचा

अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे अद्याप महाविद्यालयांकडे प्रलंबित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा