Advertisement

विद्यार्थ्यांनो एटीकेटीची परीक्षा द्यावीच लागणार


विद्यार्थ्यांनो एटीकेटीची परीक्षा द्यावीच लागणार
SHARES

मंगळवारी ८ नोव्हेंबरपासून एटीकेटीची परीक्षा सुरू होत आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने पुर्नमूल्यांकनाचे निकालच अजून लावलेले नाहीत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एटीकेटीची परिक्षा द्यावीच लागणार आहे.

एटीकेटीच्या परीक्षेच्या पूर्वी पुनमूल्यांकनाचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये. लवकरच निकाल लागतील, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी परिक्षा संचालक अर्जुन घाटूळे यांनी सांगितले होते. मात्र अजूनही हजारो विद्यार्थ्यांचे निकाल लागणे बाकी आहेत.

मंगळवारी ७ सप्टेंबरपर्यंत पुर्नमूल्यांकनाचे २८ हजाराहून अधिक निकाल लागणे बाकी होते. १९ सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाने मे २०१७ मध्ये झालेल्या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर ५० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज भरले होते. मात्र एटीकेटीची परीक्षा तोंडावर आली असताना देखील विद्यार्थ्यांना त्यांचे पुर्नमूल्यांकनाचे निकाल मिळाले नाहीत.


माझा निकाल अद्याप जाहीर न झाल्यामुळे माला एटीकेटीची परीक्षा द्यावी लागणार आहे. मी पुर्नमूल्यांकनाच्या अर्जाच्या वेळी देखील पैसे भरले. आता एटीकेटीच्या अर्जाचे पैसे भरावे लागले. माझे पैसे वाया गेले पण माझा निकाल मिळाला नाही. आता एटीकेटीची परीक्षा देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.
- विक्रांत दातार, विद्यार्थी


विद्यार्थी संघटना संतप्त

अनेकवेळा आंदोलन करून देखील निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळचालवला आहे. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना एटीकेटीची परीक्षा द्यावी लागत आहे, असे मत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल मातोले यांनी व्यक्त केले.

स्टूडन्ट लॉ काऊंन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यापीठाचे डोके ठिकाणावर येत नसेल तर सामूहिक उपोषण करू, असा इशारा त्यांनी विद्यापीठाला दिला आहे. जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत विद्यापीठात उपोषण करणार असल्याचे त्यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितले.



हेही वाचा - 

विद्यार्थी विचारताहेत, 'एटीकेटीची परीक्षा द्यायची की नाही'?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा