Advertisement

अकरावी प्रवेश : तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर

8,684 विद्यार्थ्यांसाठी प्रथम पसंतीचे महाविद्यालय

अकरावी प्रवेश : तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर
SHARES

मुंबई (mumbai) महानगर क्षेत्रातील 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी तिसरी विशेष प्रवेश (admission) यादी गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील (college) 1 लाख 18 हजार 939 जागांसाठी 17,488 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

त्यापैकी 13  हजार 145 विद्यार्थ्यांना कॉलेज देण्यात आले, तर तिसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या 4 हजार 343 विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची प्रतीक्षा आहे.

तसेच 8,684 विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय, 1,752 विद्यार्थ्यांना द्वितीय पसंतीचे महाविद्यालय आणि 929 विद्यार्थ्यांना त्यांच्या तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे.

सर्व जागांचे प्रवेश जाहीर झाल्याने काही महाविद्यालयांनी संबंधित शाखांसाठी तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची नामांकित व पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकली.

तसेच, दुसऱ्या विशेष फेरीच्या तुलनेत, तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत वाणिज्य शाखेसाठी प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) स्थिर आहेत आणि 1 ते 2 टक्क्यांनी किंचित कमी झाले आहेत.

तसेच काही महाविद्यालयांच्या कला आणि विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रतेच्या गुणांमध्ये 3 ते 4 टक्के घट झाली आहे. तर काही महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रतेच्या गुणांमध्ये 1 ते 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रवेशाच्या पहिल्या तीन नियमित फेऱ्यांच्या तुलनेत, तिन्ही विशेष फेऱ्यांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ-उतार दिसत आहेत.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल

तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा आणि दुहेरी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेशयादीत स्थान मिळालेले विद्यार्थी शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करू शकतात.

विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवेश निश्चित करायचा असल्यास त्यांना मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी त्यांच्या स्वत:च्या लॉगिनमधील 'अपलोड आवश्यक कागदपत्रे' या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावी आणि 'प्रवेशासाठी पुढे जा' या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात जाऊन त्यांचा प्रवेश निश्चित करावा.



हेही वाचा

महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी नवीन नियमावली लागू

गणेशोत्सवात हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा