Advertisement

'त्याने' मला लग्नाचे वचन दिले होते, पण... - कंगना


'त्याने' मला लग्नाचे वचन दिले होते, पण... - कंगना
SHARES

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत आणि वादविवाद यांचे नाते तसे जुनेच. कंगना रणौतने कोणते वक्तव्य करावे आणि ते कोणाला झोंबले नसेल तरच नवल! नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंगना चर्चेत असते. या वेळी सुद्धा कंगनाने हृतिक रोशनवर थेट निशाणा साधला आहे. फक्त हृतिकच नाही, तर राकेश रोशनवरही तिने आगपाखड केली आहे



कंगना आणि हृतिकचे तथाकथित प्रेम आणि त्यानंतर भांडण काही नवे नाही. यासंदर्भात सर्वांनाच माहिती असेल. कंगनाने कधी यावर मनमोकळेपणाने वक्तव्य केले नाही. पण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपली स्पष्ट भूमिका तर मांडलीच आहे, शिवाय हृतिकवर टीका देखील केलीय.


'हृतिकने माझ्या इमेलवरून स्वत:ला मेल केले'

हृतिक रोशनने दावा केला होता की, 'कंगनाने त्याला १ हजार ४३९ इमेल केले आहेत. हे इमेल खूप खाजगी होते. या इमेलमध्ये "मुझे तो तुम्हारी याद आ रही है, मैं तो मर गई, मेरे दिमाग में प्रॉब्लम है, तुम मेरा इलाज करा दो" असे मेसेज होते



यावर उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'हृतिकने ते इमेल माझ्याच अकाऊंटवरून स्वत:ला केले होते. हृतिक काय विश्वामित्र आहे का, जे मी मेनका बनून त्याच्या पाठी लागेन? माझा स्वत:वर कंट्रोल नसणार का? समजा मी हृतिकला मेल केले असतील, पण या मेलची आठवण हृतिकला दोन वर्षांनंतर व्हावी? मी त्याच्यासोबत सात वर्षांपासून काम करत आहे. मग हृतिकने मला कॉल करून अशा मेलचे कारण का नाही विचारले? क्या तुम मेल करती रहती हो यार, तुम्हे कुछ काम नहीं है क्या? असे त्याने विचारायला हवे होते. तुला एक मुलगी ऐवढे मेल करतेय आणि हे तुला दोन वर्षांनंतर लक्षात येते. असे कधी होते का?'


'मला वेडे करण्याचा कट रचला'

'मला वेड लागण्यासाठी हे हृतिकचे कारस्थान होते. त्याने स्वत: हे मेल केले', असे अनेक आरोप कंगनाने केले आहेत. हृतिकला असे दाखवायचे होते की, माझी मानसिक स्थिती ठीक नाही. म्हणजे मी जगजाहीर केले असते की, हृतिकने मला लग्नाचे वचन दिले आहे, तर लोकांनी माझावर विश्वास ठेवला नसता. माझ्या बोलण्यावर किंवा त्याच्या संदर्भातील माझ्या वक्तव्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, म्हणून त्याने हे सर्व कारस्थान रचल्याचे कंगनाने म्हटले. कंगना आजारपणात अशी बडबड आणि खोटे आरोप करत आहे, असे त्याला जगाला दाखवायचे होते. त्यासाठी हृतिकने स्वत:च माझ्या मेल आयडीवरून मेल केले' असा आरोप कंगनाने केला.



'मला लग्नाचे प्रॉमिस केले होते, पण...'

आम्ही नात्यामध्ये होतो तेव्हा मी त्याला लग्नासाठी कुठलीच बळजबरी केली नव्हती. हृतिक मला बोलला होता की, मी आधीपासून एका नात्यात आहे. त्यामुळे मी आपले नाते जगासमोर स्विकारू शकत नाही आणि मी माझ्या पत्नीलाही सोडू शकत नाही. तेव्हा आमचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर हृतिकला त्याच्या पत्नीने घटस्फोट दिला. तो पुन्हा माझ्याकडे आला आणि आपण लग्न करूया असे म्हणाला. मी त्याला पुन्हा एकदा विचार करायची संधी दिली. त्यानंतर आमच्यात मतभेत झाले.


'माझी लढाई अजून संपली नाही'

जोपर्यंत हृतिक आणि त्याचे वडील राकेश रोशन माझी सार्वजनिकरित्या माफी मागत नाहीत, तोपर्यंत मी यावर वक्तव्य करतच राहणार, असे कंगना यावेळी बोलताना म्हणाली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा