Advertisement

‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण


‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण
SHARES

प्रेम या एका शब्दातच संपूर्ण जग सामावून गेलेलं आहे. मराठी रुपेरी पडद्यावर आलेल्या अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेमकथेवर आधारित ‘काय झालं कळंना’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर अनावरण नुकतेच कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत अंधेरीच्या राजाच्या चरणी दिमाखात संपन्न झाले. यावेळी कलाकारांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली.



‘काय झालं कळंना’ आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमाद्वारे सामाजिक संदेश मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे यांच्या भूमिका आहेत.



हेही वाचा

'छंद प्रितीचा' चित्रपटाचं पोस्टर लाँच


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा