Advertisement

आर्चीचा दुसरा मराठी चित्रपट!


आर्चीचा दुसरा मराठी चित्रपट!
SHARES

'सैराट' फेम आर्ची म्हणजेच 'रिंकू राजगुरू' आणि परशा म्हणजे 'आकाश ठोसर' आजही प्रेक्षकांच्या तेवढेच लक्षात आहेत, जेवढे सैराट सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा होते. आर्चीच्या प्रेमात तर संपूर्ण महाराष्ट्र पडला होता. खऱ्या अर्थी आर्चीने प्रेक्षकांना 'याड' लावलं होतं, असं म्हणायला हरकत नाही.



आर्चीच्या चाहत्यांसाठी आता एक गुड न्यूज आहे. रिंकू राजगुरू लवकरच एका मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रिंगण' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिवाळीचा मुहूर्त साधून या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.



अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, सर्वांना भावेल असं कथानक या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 'निर्मित' या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सुधीर कोलते यांनी या पूर्वी 'चिडिया' या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात विनय पाठक यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत.



मकरंद आणि रिंकू या दोघांना एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच मकरंद आणि रिंकू हे दोघंही अकलूजचे आहेत. रिंकूच्या रुपाने या कथेच्या नायिकेचा शोध पूर्ण झाला असून चित्रपटाची कथा ऐकून तिनंही तत्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे सैराटमधून प्रेक्षकांना याड लावलेली आर्ची आता पुन्हा प्रेक्षकांना याड लावणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.



हेही वाचा

तापसी पन्नू म्हणते गुस्सा नई होने का!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा