Advertisement

स्वयंसेवी संस्थेनेही विवेकला दाखवला बाहेरचा रस्ता

एक्झिट पोलनंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याबाबत मीम शेअर करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता विवेक ओबेराॅय चांगलाच अडचणीत सापडला आहे. स्माइल फाऊंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेनेही त्याला आपल्या कार्यक्रमातून हटवलं आहे.

स्वयंसेवी संस्थेनेही विवेकला दाखवला बाहेरचा रस्ता
SHARES

एक्झिट पोलनंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याबाबत मीम शेअर करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता विवेक ओबेराॅय चांगलाच अडचणीत सापडला आहे. महिला आयोगाने विवेकला नोटीस पाठवली असून काँग्रेसने त्याच्या अटकेची मागणी केली आहे. त्यातच स्माइल फाऊंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेनेही त्याला आपल्या कार्यक्रमातून हटवलं आहे. 


संस्थेचं स्पष्टीकरण

अभिनेता विवेकला डीएलएफ प्रोमिनाडमध्ये ओडिशा फनी चक्रीवादळग्रस्तांसाठी निधी जमा करण्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. मात्र, वादग्रस्त ट्विटनंतर विवेकला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्पष्ट शब्दांत मनाई करण्यात करण्यात आली. आमची संस्था प्रामुख्याने महिला सक्षमीकरणासाठी काम करते. परंतु, विवेकने केलेलं ट्विट आमच्या विचारधारेशी विसंगती दर्शवणारं आहे.' अशी प्रतिक्रीया स्माइल फाऊंडेशनकडून देण्यात आली. 


विवेकने मागितली माफी

'अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला गंमतीशीर वाटतात, त्या दुसऱ्यालाही गंमतीच्या वाटतील असं मुळीच नाही. मी मागची १० वर्षे २ हजार मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम केलं आहे. त्यामुळे कुठल्याही महिलेचा माझ्याकडून अवमान होईल, असं मी विचार देखील करू शकत नाही. माझ्या मीमने कुठल्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. तसंच वादग्रस्त ट्विट डिलीट केलं आहे.' असं म्हणत विवेकने या प्रकारणावर दोनदा माफी मागितली. 



हेही वाचा-

अभिनेता विवेक ओबेरॉयनं अखेर मागितली माफी

ऐश्वर्याचा ट्वीटरवर शेअर केलेला फोटो विवेक ओबेरॉयला भोवला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा