Advertisement

मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकत्व टाटा समुहाकडे


मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकत्व टाटा समुहाकडे
SHARES

अशियातील प्रसिद्ध आणि जगातील १० मोठ्या मॅरेथॉनमध्ये समावेश असलेल्या मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकत्व टाटा समुहाने स्वीकारल्याने यापुढे मुंबई मॅरेथॉन 'टाटा मुंबई मॅरथॉन' अशा नावाने ओळखली जाईल. त्यानुसार २१ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या १५ व्या मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकपद टाटा समूह आणि टाटा कन्सल्टन्सी एकत्रितपणे भूषविणार आहे. टाटा समुहाने नुकत्याच पार पडलेल्या न्यूयॉर्क मॅरेथॉनचे प्रायोजकपदही भूषवले आहे.

मागील १४ वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकपद स्टॅंडर्ड चार्टर्डकडे होते. करारानुसार टाटा समुहाकडे मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकपद पुढील १० वर्षे राहणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. यावेळी जगप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू हायले गेब्रेसेलासी, अभिनेता जॉन अब्राहम, गायक सलिम-सुलेमान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते.

सन २०१८ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण ४०५,००० डॉलर्सचे बक्षिस देण्यात येतील. २०१६ मध्ये ३८४,००० डॉलर्सचे बक्षिण देण्यात आले होते. मुंबई मॅरेथॉनच्या १५ व्या स्पर्धेत ४६ हजार स्पर्धकांना ६ वेगवेगळ्या प्रकारात प्रवेश मिळेल. अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी या संकेत स्थळाला भेट देता येईल.

http://tatamumbaimarathon.procamrunning.in


काय म्हणाला हायले गेब्रेसेलासी

मी २०१३ च्या मॅरेथॉनच्या निमित्ताने मुंबईत आलो होतो. रविवारची ती सकाळ मला अजूनही आठवतेय. मुंबईकरांनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढतानाच दिसत आहे. यांत व्यावसायिक धावपटूंची संख्याही लक्षणीय आहे.


काय आहे नवीन लोगोचे वैशिष्ट्य

'टाटा मुंबई मॅरेथॉन'च्या नवीन लोगोत मुंबईतील सात बेटांचा समावेश आहे. लोगोवर मुंबईतील विविध उत्सवांना दर्शवणारे केसरी, हिरवा, निळा, लाल, पिवळा हे विविध रंग आहेत. धावती मुंबई, मुंबईचे सौंदर्य तसेच मुंबईतील डबेवाला अशा अनेक वैशिष्ट्यांवर हा लोगो आधारीत आहे. त्यातूनच धावणाऱ्या मुंबईची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.


यंदा १० के रन चा समावेश

दरवर्षी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ड्रीम मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन अशा श्रेणी असतात. यंदाच्या स्पर्धेत १० के या नव्या श्रेणीचाही समावेश करण्यात आला आहे. ही श्रेणी समाजपयोगी, उद्योन्मुख संस्थासाठी असेल. यामध्ये १५ वर्षांवरील आणि १८ वर्षांखालील स्पर्धक सहभाग घेऊ शकतील.


नवे गाणे 'निकल पडो तो मुमकिन नही'

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार, गायक सलिम-सुलेमान या जोडीने मुंबई मॅरेथॉनच्या १५ व्या भागासाठी 'निकल पडो तो मुमकिन नही' हे गाणे गायले आहे. हे गाणे प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. धावपटूंना प्रोत्साहन मिळेल असेच हे गाणे आहे.



हे देखील वाचा -

..तेवढ्या पैशांचं तर माझा मुलगा चॉकलेट खातो - सेहवाग



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा