सीएसटी - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवारी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन हा दिवस साजरा केला. सीएसटी रेल्वे पोलीस ठाणे यांच्याकडून या पुष्पगुच्छांचं वाटप करण्यात आलं. यासह विविध स्थानकांवर महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.