Advertisement

नवी मुंबई : बामणडोंगरी गृहनिर्माण संकुलात खरेदी करा स्वतःचे दुकान

ऑनलाइन नोंदणी 30 ऑगस्टपासून सुरू होईल

नवी मुंबई : बामणडोंगरी गृहनिर्माण संकुलात खरेदी करा स्वतःचे दुकान
Representational Image
SHARES

सिडकोने (cidco) नवी मुंबईतील (navi mumbai) बामणडोंगरी गृहनिर्माण संकुलातील (bamandongari housing complex)100 दुकाने (shop) विकण्याची घोषणा केली आहे. या योजनेसाठी 30 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. ही योजना लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करण्याची अनोखी संधी देते.

सिडकोने भूखंड आणि  दुकानांच्या विक्रीसाठी (sale) सुरू केलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना मिळतो. तसेच यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो.

या योजनेअंतर्गत, बामणडोंगरी गृहनिर्माण संकुलात प्लॉट क्रमांक 02, सेक्टर-6, उलवे येथील 243 पैकी 100 दुकाने विक्रीसाठी उपलब्ध असतील. उलवे नोड सर्व आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे.

तसेच रेल्वे, रस्ते आणि मेट्रोद्वारे उत्तमरित्या जोडलेला आहे. महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पही जवळच आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उलवे नोडचे महत्त्व आणखी वाढले आहे.

ई-लिलाव आणि ई-निविदा प्रक्रियेद्वारे या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल.



हेही वाचा

महाराष्ट्रात प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी

GSB सेवा मंडळाने काढला 400 कोटीचा विमा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा