Advertisement

‘धुमस’चा अॅक्शनपॅक्ड टीझर


‘धुमस’चा अॅक्शनपॅक्ड टीझर
SHARES

आजच्या सिनेयुगात सिनेमांचे टीझर्स म्हणजेच पहिली झलक प्रमोशनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एखादा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ट्रेलरच्या अगोदरही येणारे टीझर सिनेमाची तोंडओळख करून देणारे ठरत आहेत. नुकताच ‘धुमस’ या आगामी मराठी सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड टीझर प्रदर्शित झाला आहे.


जबरदस्त अॅक्शन सीन्स

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘धुमस’चा टीझर रीलीज करण्यात आला आहे. गरुड फिल्मस्ची निर्मिती असलेल्या ‘धुमस’चं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील युवा नेते उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटाद्वारे सिनेनिर्मितीसोबतच अभिनयातही पदार्पण करत आहेत. जानकर आणि पडळकर यांनी या सिनेमात जबरदस्त अॅक्शन सीन्सही केले असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळतं. 


पी. शंकरम यांचं संगीत

अभिनेते बनलेल्या या नेत्यांसोबतच ‘धुमस’मध्ये भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, रोहन पाटील, साक्षी चौधरी, विशाल निकम, कृतिका गायकवाड, अनिल नगरकर आदी मुरलेल्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी प्रभावी अॅक्शन ‘धुमस’मध्ये पाहायला मिळार आहे. पी. शंकरम यांचं संगीत या सिनेमाला लाभलं असून, सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांनी चित्रपटातील गीतं गायली आहेत. 

 


हेही वाचा -

सावधान, पुढे गाव आहे'!

माधुरी पवार बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा