Advertisement

अण्णा बनून साऊथ आफ्रिकेहून परतला संजय नार्वेकर

मागील काही दिवसांपासून चित्रपटांपेक्षा रंगभूमीवरच जास्त रमलेला मराठमोळा अभिनेता संजय नार्वेकर पुन्हा एकदा अण्णाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा अण्णा आता साऊथ आफ्रिकेहून भारतात परतला आहे.

अण्णा बनून साऊथ आफ्रिकेहून परतला संजय नार्वेकर
SHARES

मागील काही दिवसांपासून चित्रपटांपेक्षा रंगभूमीवरच जास्त रमलेला मराठमोळा अभिनेता संजय नार्वेकर पुन्हा एकदा अण्णाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा अण्णा आता साऊथ आफ्रिकेहून भारतात परतला आहे.

‘अण्णा परत येतोय’

मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटानं तिकीटबारीवरही चांगलेच पैसे कमावले. त्यामुळं लगेचच या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणाही करण्यात आली होती. ‘ये रे ये रे पैसा’मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या, पण त्यापैकी संजय नार्वेकरनं साकारलेली अण्णा ही भूमिका लक्षवेधी ठरली होती. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘अण्णा परत येतोय’ अशा आशयाचे मीम्स व्हायरल झाले होतो. हा अण्णा दुसरा तिसरा कुणी नसून ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटातील संजय असल्याचा उलगडा आता झाला आहे.

मध्यवर्ती भूमिका

‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात अण्णा ही मध्यवर्ती भूमिका साकारत संजयनं धमाल उडवून दिली होती. साऊथ आफ्रिकेत गेलेला अण्णा ‘ये रे ये रे पैसा २’मध्ये भारतात परत आल्याचं पहायला मिळणार आहे. ‘ये रे ये रे पैसा’चं यशस्वी दिग्दर्शन संजय जाधवनं केल्यानंतर दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची धुरा लेखक-अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेकडं सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या भागामध्ये पहिल्या भागापैकी कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत अद्याप तरी काहीच सांगण्यात आलं नसलं तरी ‘मुंबई लाइव्ह’ला मिळालेल्या माहितीनुसार संजयप्रमाणे मृणाल कुलकर्णीही या चित्रपटात दिसणार आहे.

९ ऑगस्टला प्रदर्शित

संजयच्या कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट महत्त्वाचा मानला जात आहे. कारण दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’मध्ये संजय दत्तच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारणारा संजय तेव्हा ‘देडफुट्या’ या नावानं ओळखला जायचा, पण ‘ये रे ये रे पैसा’नंतर तो अण्णा या नावानंही फेमस झाला आहे. त्यामुळं संजयनं साकारलेला अण्णा ‘ये रे ये रे पैसा २’मध्ये काय धमाल करतो ते पहायचं आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



हेही वाचा -

पावसाळ्यात तक्रारींचा पाऊस, अग्निशमन दलातील ९२७ पदे अद्याप रिक्तच

सलग चौथ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा