Advertisement

नाजुकावर ‘प्रीती सुमने’ उधळणार सुबोध

‘अगडबम’ या चित्रपटातील नाजुकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. मराठी सिनेसृष्टीत प्रथमच संपूर्ण शरीराला प्रोस्थेटिक्स मेकअप केल्याने नाजुका साकारणारी अभिनेत्री तृप्ती भोईर लाइमलाईटमध्ये आली होती. आता ही नाजुका ‘माझा अगडबम’च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नाजुकावर ‘प्रीती सुमने’ उधळणार सुबोध
SHARES

आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या सिनेमात २५० किलो वजन असलेली लठ्ठ नाजुका आणि तिचा पती रायबा यांची कथा पाहायला मिळाली होती. ‘माझा अगडबम’ या सिक्वेलमध्येही पुन्हा या दोघांची केमिस्ट्री नव्याने पहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता सुबोध भावे रायबाच्या भूमिकेत नाजुकावर ‘प्रीती सुमन’ उधळताना दिसणार आहे.



 प्रोस्थेटिक्स मेकअप 

‘अगडबम’ या चित्रपटातील नाजुकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. मराठी सिनेसृष्टीत प्रथमच संपूर्ण शरीराला प्रोस्थेटिक्स मेकअप केल्याने नाजुका साकारणारी अभिनेत्री तृप्ती भोईर लाइमलाईटमध्ये आली होती. आता ही नाजुका ‘माझा अगडबम’च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘माझा अगडबतृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ हा सिनेमा म’मधील ‘अटकमटक...’ हे विनोदी गाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच, या सिनेमातील ‘प्रीती सुमनें...’ हे लव्ह साँग सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.


आगळ्यावेगळ्या प्रेमावर आधारित 

सुबोध भावे आणि तृप्ती भोईर यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘प्रीती सुमनें...’ हे गाणं नाजूका आणि तिचा पती रायबाच्या आगळ्यावेगळ्या प्रेमावर आधारित आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुबोध आणि तृप्ती प्रथमच एकत्र दिसणार असल्याने त्यांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. सर्वसामान्य प्रेमीयुगुलांपेक्षा अगदी हटके असणाऱ्या या जोडीची प्रेमछटा दाखवणारं ‘प्रीती सुमने...’ हे गाणं मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलं आहे. टी. सतीश चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, पार्श्वगायिका श्रेया घोषालच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. 



नाजूका व्यक्तिरेखेवर

पेन इंडिया लिमिटेड कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ हा सिनेमा नाजूका या प्रमुख व्यक्तिरेखेवर आधारित आहे. २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या ‘माझा अगडबम’चं दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केलं असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीही केली आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.



हेही वाचा -

नागराज बनवणार ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'चा 'प्रोमो'!

‘हलाल’ला फिल्मफेअरमध्ये आठ नामांकनं



 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा