जोगेश्वरी - श्यामनगर तलाव इथं रविवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत नाट्यसंगिताचे सूर गुंजणारायेत. या कार्यक्रमाद्वारे जुन्या अविट नाट्यसंगितांचा उजाळा रसिकांना मिळणाराय. ऑरगम, हार्मोनियम, तबल्याच्या साथीनं श्रोते मंत्रमुग्ध होणारायेत. या कार्यक्रमास जोगेश्वरी विधानसभेचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर, नगरसेवक अनंत नर हे प्रमुख उपस्थिती लावणारायेत. रविंद्र वायकर यांच्या सौजन्यानं हा कार्यक्रम पार पडणाराय.