मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RajThackeray) यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. सध्या त्यांच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे.
राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलं आहे. राज ठाकरेंचं हे ट्वीट उद्धव ठाकरे यांना उद्देशून असल्याचं म्हटलं जातं आहे.
राज ठाकरेंनी एक ट्वीट केलं आहे की, "एखादा माणूस ज्या दिवशी आपल्याच नशिबालाच स्वतःचं कर्तव्य समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो."
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसेकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरेंच्या विरोधात नेहमीच द्वेषाचं राजकारण करणाऱ्या आणि प्रत्येक बाबतीत राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला अजिबातच सहानुभूती नाही.
दरम्यान, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार आहेत. यासंदर्भात अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं नाही.
2005 मध्ये, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. पक्ष सोडत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरेंनी बंड केले.
महाराष्ट्र, गुजरात आणि आसाममध्ये घडलेल्या आठवडाभर चाललेल्या नाट्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राज्यपाल बीएस कोश्यारी यांच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राजीनामा जाहीर केला.
हेही वाचा