दहिसर - एनएल कॉम्प्लेक्सच्या मनपा मैदानात शनिवारी पोलीस क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दहिसर पोलीस स्टेशनच्या संघाने विजय मिळवला. तर वनराई पोलीस संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मोहल्ला कमिटी मुव्हमेंट ट्रस्टच्या वतीने टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. यात वनराई पोलीस, दिंडोशी पोलीस, कुरार पोलीस, समतानगर पोलीस, कस्तुरबा पोलीस आणि दहिसर पोलीस अशा 7 संघांनी सहभाग घेतला होता. या वेळी कांदिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेले, दहिसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मर्दे उपस्थित होते.