मुलुंड - म्हाडा कॉलनी परिसरातल्या मैदानात कबड्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सत्यवान दळवी यांनी कबड्डी महोत्सवाचं आयोजन केलंय. हा महोत्सव रविवार म्हणजे 25 डिसेंबरपर्यंत रंगणाराय.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथल्या अनेक संघांनी या महोत्सवात सहभाग घेतलाय. रविवारी अंतिम सामना होणार आहे. महिला आणि पुरुष असे दोन संघ विजयी घोषित करण्यात येतील. विजेत्यांना पारितोषिक म्हणून मनसे कप देण्यात येणार आहे.