चेंबूर - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंती दिनानिमित्त "सावित्रीच्या लेकी" हा कार्यक्रम चेंबूर पंचशील नगरमध्ये बुधवारी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यामध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना सावित्रीबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याबाबतची माहिती देण्यात आली. या वेळी मी "सावित्री बोलत" हे एकपात्री नाटक सादर केलं. या कार्यक्रमाला स्थानिक टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे, कवी बबन सरवदे, अॅड. संतोष सांजकर हे मान्यवरही उपस्थित होते.