पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस गाड्या 28 ते 30 जून या कालावधीत बंद राहतील. पुणतांबा-कणेगाव आणि दौंड-मनमाड या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे या दोन्ही एक्स्प्रेस रद्द राहतील. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस पुढील शुक्रवारी (तारीख 28) रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (तारीख 29) मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. त्याच दिवशी 'पुणे-मुंबई इंटरसिटी'ही रद्द करण्यात आली आहे. रविवारी (तारीख 30) मुंबई-पुणे इंटरसिटी रद्द करण्यात आली आहे.
मुंबईकरांच्या चिंतेत वाढ
मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणी येऊ शकतात. कारण इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे या गाड्यांवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांनी या दिवसात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Clarification on the cancellation of trains between PUNE-CSMT-PUNE Intercity Express & Deccan Express due to block on Daund-Manmad Section of Pune Division.
— DRM Pune (@drmpune) June 21, 2024
Reason is highlighted in RED. https://t.co/ICVqznw0eA pic.twitter.com/WZwTGdgvkK
रेल्वे विभागाने घोरपडी येथील डिझेल लोको शेडच्या छतावर साडेसहा हजार चौरस मीटर जागेवर सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. डिझेल लोको शेडवर बसवलेले सोलर पॅनल वर्षाला 9.44 लाख किलोवॅट वीज निर्माण करतील.
रेल्वेच्या वीजबिलात वर्षाला 52 लाख रुपयांची बचत होणार आहे. घोरपडी येथे रेल्वेचे डिझेल लोको शेड आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी येथे बसवण्यात आलेल्या 647 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी डिझेल लोको शेडचीही पाहणी केली.
पुणे-लोणावळा मार्गाची पाहणी
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी पुणे विभागातील लोणावळा-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी लोणावळा-पुणे डाऊन आणि अप मार्गाच्या सर्व तांत्रिक बाबींची तपासणी केली. ज्यात इलेक्ट्रिकल ओव्हरहेड उपकरणे (OHE), पुलांची स्थिती, तपासणी कोचच्या खिडकीतून सिग्नल यंत्रणा, प्रवाशांच्या सुरक्षेकडे व प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा