सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' (Dil Bechara) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूतबरोबर संजना सांघी (Sanjana Sanghi) हा नवा चेहरा दिसणार आहे.
सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला. #DilBecharaTrailer, #SushantSinghRajput असे ट्रेंड सुरू झाले. काही तासांमध्येच ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ट्रेलर पाहून सुशांतच्या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २४ जुलै रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
सुशांतच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, "माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला एक चांगला अभिनेता तसेच मला एक मित्र म्हणून समजून घेणारी जवळची व्यक्ती हवी आहे, हे मला माहित होतं. असं कोणीतरी, जो या संपूर्ण प्रवासात माझ्या बाजूने उभा असेल. मला आठवतंय की, सुशांतनं मला खूप पूर्वी वचन दिलं होतं की जेव्हा कधी मी माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित करेल तेव्हा त्यात तो मुख्य भूमिका साकारेल. त्यानं दिलेलं वचन पाळलं. जेव्हा मी त्याला दिल बेचारासाठी संपर्क केला, तेव्हा त्यानं स्क्रिप्ट न वाचताच लगेच होकार दिला. आमच्यात कायम भावनिक कनेक्शन होते."
काही दिवसांपूर्वी जेव्हा 'दिल बेचारा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. अनेकांनी सोशल मीडियावर अशी मागणी केली होती की, हा चित्रपट सिनेमा गृहातच प्रदर्शित केला जावा.
मात्र चित्रपटातील मुख्य अभिनेत्री संजना सांघीने चाहत्यांना आवाहन केलं आहे की, चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यासाठी हट्ट करु नका. सोशल मीडियावर एका पत्रकाद्वारे तिने म्हटलं आहे की, 'पडदा सध्या मोठा नसला तरी आपलं मन तर मोठं होऊ शकतं. एक महान आयुष्य आणि चित्रपटचा आनंद व्यक्त करण्याची ही वेळ आहे."
हेही वाचा